सरकारचे ऍप्लिकेशन स्टोअर लवकरच - Marathi News 24taas.com

सरकारचे ऍप्लिकेशन स्टोअर लवकरच

Tag:  
www.24taas.com, मुंबई
 
मोबाईल फोनच्या माध्यमातून विविध सार्वजनिक सेवांचा लाभ घेता यावा यासाठी सरकार स्वत:चे ऍप्लिकेशन स्टोअरची निर्मिती करण्याचा विचार करत आहे. सार्वजनिक सेवांसाठीचे शुल्क भरण्यासाठी  पेमेंट गेटवेही प्रस्तावित आहे
 
 
मोबाईल उपकरणाच्या माध्यमातून ऍप्लिकेशनसाठी मोबाईल ऍप्लिकेशन स्टोअरची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार आहे. मोबाईल सर्व्हिसेस डिलिव्हरी गेटवेशी हे स्टोअर संलग्न असेल. आधार क्रमांकावर वापर या व्यवहारांसाठी करण्यात येणार आहे.
 
सध्या ऍपल, नोकिया, ब्लॅकबेरीचे निर्माते रिसर्च इन मोशन, गुगल हे ऍप्लिकेशन स्टोअरच्या माध्यमातून विविध सेवा आणि कन्टेंट उपलब्ध करुन देतात. मोबाईल गर्व्हनन्स इनोवेशन फंड स्थापण्याचाही विचार करण्यात येतो आहे.
 
सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेव मोबाईल द्वारे उपलब्ध करुन देण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशनचा विकास आणि उपलब्धता यासाठी हा निधी उपयोगात आणण्यात येणार आहे. सरकारी वेबसाइटलाही आता मोबाईलद्वारे भेट देण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत.
 
 

First Published: Saturday, January 28, 2012, 13:31


comments powered by Disqus