Last Updated: Monday, February 6, 2012, 16:19
www.24taas.com, नवी दिल्लीआक्षेपार्ह ठरविलेला मजकूर आम्ही काढून टाकल्याचे फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटने कोर्टाला कळविले आहे. फेसबुक आणि गुगलसह इतर वेबसाइटला आक्षेपार्ह मजकुरासाठी कोर्टाने नोटीस पाठवली होती. त्याला या कंपन्यांनी उत्तर दिले आहे.
फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटवर प्रकाशित होणारा काही मजकूर धार्मिक तेढ वाढविणारा आणि समाजाला घातक असल्याचे मुफ्ती अयाझ अर्शद काझमी यांनी दिल्ली कोर्टात याचिका दाखल करून नमूद केले होते. त्यावर कोर्टाने फेसबुक, गुगल, याहू, युट्युब, ब्लॉगस्पॉट, मायक्रोसॉफ्ट अशा मोठमोठ्या कंपन्यांना या प्रकरणी आपली भूमिका मांडण्यास सांगितले होते.
एखाद्या ब्लॉगवर युझरने टाकलेल्या मजकुराबद्दल, तो ब्लॉग इंटरनेटवर आणण्या-या कंपनीला दावेदार करणे योग्य आहे का ? अशी शंका अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी काझमी यांच्या वकिलापुढे उपस्थित केली. तसेच कोर्टाने गुगलची याप्रकरणी वेळेत योग्य ते उत्तर न दिले म्हणूनही कानउघडणी केली.
काझमी यांची याचिका प्राधान्याने दूषित धार्मिक मजकूर काढून टाकण्याची आहे. मात्र त्यात असभ्य तसेच सामाजिक सौहार्दाला धक्का लावणाऱ्या मजकुरावर आक्षेप आहे. काही दिवसांपूर्वी दूरसंपर्क मंत्री कपिल सिब्बल यांनी ' सोशल नेटवर्किंग साइट्स ' च्या विकृत वापराबाबत तक्रार केली तसेच त्यांच्यावर काही बंधने असावीत , असे मत व्यक्त केले होते.
संबधित बातम्या वेबसाईटवर नियंत्रण अशक्य- गुगलकाँग्रेसने केली फेसबुक, ऑर्कुट पोस्टर्सची होळीसंबंधित व्हिडिओफेसबुक, गुगलला नोटीस संबंधित ब्लॉगसोशल नेटवर्किंग नव्हे… ‘नॉटवर्किंग’
First Published: Monday, February 6, 2012, 16:19