मुंबईतील कॉलेज घालणार ‘आकाश’ला गवसणी - Marathi News 24taas.com

मुंबईतील कॉलेज घालणार ‘आकाश’ला गवसणी

www.24taas.com, मुंबई
जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट पीस असणाऱ्या ‘आकाश’ला मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
विद्यापीठाने तब्बल ३० हजारांहून अधिक आकाश टॅब्लेट्सची मागणी केली असून विशेष म्हणजे त्यापैकी २७ हजार टॅब्लेट्ससाठी ७० महाविद्यालयांनी आधीच नोंदणी केली आहे. यात ६० टक्के महाविद्यालये मुंबईतील असल्याने शहरातील महाविद्यालयांनांना  ‘आकाशा’ला गवसणी घालायची दिसते आहे.
 
टॅब्लेट पीसीद्वारे तंत्रज्ञानाच्या मार्गाने  देशभरात शिक्षण पोहोचावे, या उद्दिष्टाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आकाश या स्वस्तातल्या टॅब्लेटची निर्मिती केली. अतिशय कमी किमतीतील हे टॅब्लेट्स अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी मुंबई विद्यापीठाने डिसेंबर-जानेवारीदरम्यान आपल्या क्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना एक पत्रक पाठवले होते.
 
या पत्रकानुसार आकाश टॅब्लेटच्या एकूण किमतीपैकी ११३८ रुपये हे विद्यार्थ्यांने किंवा महाविद्यालयाने भरायचे आणि तेवढेच पैसे केंद्र सरकार प्रत्येक विद्यार्थ्यांमागे भरणार, असे म्हटले होते.

First Published: Wednesday, February 8, 2012, 13:56


comments powered by Disqus