पंतप्रधान आता युट्युबवरही... - Marathi News 24taas.com

पंतप्रधान आता युट्युबवरही...

www.24taas.com, नवी दिल्ली
पंतप्रधान कार्यालयाने आता युट्युबवरही पदार्पण केलं आहे. याआधी ट्विटरच्या माध्यमातून लोकांसी संवाद साधण्याचा उपक्रम पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हाती घेतला होता. आता युटयुबवर व्हिडिओ अपलोड करुन त्याद्वारे लोकांशी पंतप्रधान कार्यालय संवाद साधणार आहे. पीएमओइंडिया आता युटयुबवर pmofficeindia नावाने उपलब्ध असेल. आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांशी अधिक संवाद साधु असं पंतप्रधान कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.
 
पंकज पचौरी यांनी पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून काम हाती घेतल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर आणि युट्युब सारख्या नव्या माध्यमांचा उपयोग करुन घ्यायला सुरुवात केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या परिसंवादात पंतप्रधानांनी केलेले भाषण युट्युबवर अपलोड करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने अपलोड केलेला हा पहिला व्हिडिओ आहे. त्यानंतर मागील वर्षी महात्मा गांधींच्या समाधीस्थळ राजघाटला पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीचा व्हिडोओही अपलोड करण्यात आला आहे.
 
 
 
 

First Published: Monday, March 12, 2012, 12:44


comments powered by Disqus