Last Updated: Wednesday, March 14, 2012, 16:00
www.24taas.com, नवी दिल्ली चांगला आणि स्वस्त असे बिरूद मिरवणारा 'आकाश' आता एप्रिलमध्ये लाँच होणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी केली आहे.
'आकाश' याची टॅब्लेटची नवीन आवृत्ती 'आकाश-2' एप्रिल महिन्यात सादर करणार करण्यात येणार असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. त्यामुळे आता या नविन 'आकाश-२' कडे लक्ष लागले आहे. आकाश टॅब्लेट हा जगातील सर्वांत स्वस्त टच संगणक आहे. आकाश-2 मध्ये वेग, बॅटरीची क्षमता व उत्तम प्रकारच्या स्क्रीन असणार आहे.
डाटावाईंड कंपनी एक लाख टॅब्लेट उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती सिब्बल यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. एक लाख टॅब्लेट हे तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आहेत, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे. 'आकाश' साठी शाळा आणि महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'आकाश' ची घोषणा झाल्यापासून तो खरेदी करण्यासाठी आणि नाव नोंदणीसाठी तरूणांच्या उड्या पडल्या आहेत.
First Published: Wednesday, March 14, 2012, 16:00