गुणसूत्रच बनवतं पुरूषांना आक्रमक - Marathi News 24taas.com

गुणसूत्रच बनवतं पुरूषांना आक्रमक

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
कधी विचार केलाय का की ताण तणावाच्या परिस्थितीत स्त्रियांपेक्षा पुरूषच जास्त आक्रमक का होतात? पुरूषांमध्ये आढळून येणारं व्हायएसआर हे एकमेव पौरुषेय गुणसूत्र याला कारणीभूत असते.
 
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी वायएसआर गुणसूत्राचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांच्या मते याच जीनमुळे स्त्री आणि पुरूषांमधला गोंधळाच्या वातावरणातला स्वाभाविक फरक ध्यानात येतो. टेन्शनच्या परिस्थितीत पुरूषांचं गोंधळून जाणं, आक्रमक होणं किंवा पळ काढणं हे या जीनमुळे घडतं. स्त्रिया मात्र या जीनच्या आभावामुळेच कुठल्याही गोंधळात शांत राहून मार्ग काढतात.
 
वाय क्रोमोसोममध्ये मध्ये जीन आढळून येतं. पूर्वी असा गैरसमज होता की हे जीन फक्त गर्भामधील पुरुषगुणांचा विकास करण्यासाठीच परिणामकारक ठरतं. पण, आता सिद्ध झालंय की या जीनमुळेच पुरूष  आक्रमक बनतात.
लाइव्हसायंसमध्ये दिलं आहे की मेलबर्नचे प्रिंस हेनरी इंस्टिट्यूटचे प्रोफेसर जूह यंग ली आणि मोनाश युनिव्हर्सिटीचे प्रो. व्हिंसेंट हार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभ्यासात लक्षात आलंय की या जीनमधील प्रोटीन प्रौढ पुरूषांच्या मेंदूमध्ये आणि इतर अवयवांमध्ये आढळतो.

First Published: Wednesday, March 14, 2012, 15:53


comments powered by Disqus