ऑपरेटींग सिस्टीमचा 'लिटील मास्टर' - Marathi News 24taas.com

ऑपरेटींग सिस्टीमचा 'लिटील मास्टर'

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
नागपूरमध्ये एका १५ वर्षीय मुलानं स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम तयार केली. असद दमानी या मुलांन एक वर्षाच्या कालावधीत ही सिस्टीम तयार केली. मायक्रोसॉफ्ट, विन्डोज अशा सिस्टीमपेक्षा अधिक आधुनिक ऑपरेटींग आपण बनवल्याचा दावा असदनं केला.

लॅपटॉपवर सराईतपणे काम करणारा असद दमानी एखाद्या कॉम्प्यूटर इंजिनिअरलाही जमणार नाही अशी ऑपरेटींग सिस्टीम १५ वर्षीय असदनं तयार केली. हि सिस्टीम अधिक सुरक्षित आणि जलद आहे. यासाठी कॉम्प्यूटरमध्ये वेगळा एन्टी व्हायरस टाकण्याची गरज नाही. तसंच या ऑपरेटींग सिस्टीममध्ये जी फाईल एप्लिकेशन टाकली जातात ती हॅक होण्याचा धोकाही नाही. त्यामुळं कॉम्प्युटर विश्वात एक नवी सिस्टीम असदनं तयार केली. त्यामुळंच त्याच्या पालकांनाही त्याचा अभिमान आहे.
 
असदला हि सिस्टीम बनवण्यासाठी १ वर्षांचा कालावधी लागला. शाळेतून आल्यावर रोज ६ ते ७ तास वेळ तो यासाठी देत असे. असदनं तयार केलेली सिस्टीम जेव्हा कार्यरत होऊन तिचा वापर सुरु होईल त्याचवेळी तिची उपयोगिता पाहणं योग्य ठरेल. असं संगणक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 

First Published: Sunday, November 13, 2011, 07:28


comments powered by Disqus