ब्लॅकबेरीचा मोबाईल @ 9,000 - Marathi News 24taas.com

ब्लॅकबेरीचा मोबाईल @ 9,000

Tag:  
www.24taas.com, नवी दिल्ली 
 
 
ब्लॅकबेरीने ग्राहकांसाठी खूश करण्यासाठी नवा मोबाईल बाजारात आणला आहे.  या मोबाईलची किंमत कमी दरात असल्याने  तो ग्राहकांना घेण शक्य होणार आहे. ब्लॅकबेरीचा हँडसेट बाजारात  दबदबा आहे. कंपनीने आपला ब्लॅकबेरी स्ट्रॉम हँडसेट आता ९००० रुपयांपेक्षा कमी किमतीत विकणार आहे. याची किंमत ८,८९९ रूपये असणार आहे.
 
 
ब्लॅकबेरीचा नवा स्ट्रॉम हँडसेट बाजारात आणला आहे. हा मोबाईल फुल टचस्क्रीन असणार आहे. या हँडसेटमध्ये ३  मेगापिक्सल कॅमेरा आहे. ब्लॅकबेरी स्ट्रॉमची बाजारातील किंमत २४,००० रुपये आहे. मात्र, ऑनलाइन शॉपिंगमध्ये ६१  टक्के सवलतीसह हा हँडसेट ८,८९९ रुपयांना उपल्ब्ध आहे. हा हँडसेट सध्या ऑनलाइन नोंदणीवरच मिळतो. कंपनीच्या शो-रूममध्ये हा हँडसेट उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहक थोडेसे नाराज होणार आहेत.
 
 
ब्लॅकबेरीचा मोबाईल स्ट्रॉममध्ये विविध  सुविधा आहेत. यात ५२८ मेगाहर्ट्झचे एआरएम,  ३  मेगापिक्सल कॅमे, ११ प्रोसेसर आणि १६ जीबीची वाढवता येणारी मेमरी, एज कनेक्टिव्हिटी, जीपीएस आणि ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. त्यामुळे हा  मोबाईल इतर मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धा वाढून मोबाईलच्या किमतीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

First Published: Tuesday, March 20, 2012, 12:49


comments powered by Disqus