Last Updated: Tuesday, March 20, 2012, 13:51
www.24taascom, वॉशिंग्टन पृथ्वीवर साडे सहा कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या महाकाय मांसभक्षक टायरानोसोर रेक्स प्रजातीच्या डायनोसोरच्या दातांच्या ठेवणीसंदर्भातील माहिती पुढे आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाच्या सशोधकांच्या एका पथकाला डायनासोरच्या या प्रजातीच्या दातांमध्ये काही पोकळ जागा आढळली आहे. तसंच दातांच्या फटी खूप मोठ्या असल्याचं लक्षात आलं.
टीमच्या अगुवा मरियम रशेल यांनी म्हटलं, “या प्रकारच्या दंतपंक्तिमुळे डायनोसोरचे दात अत्यंत मजबूत बनले. यामुळेच डॉयनॉसोर मांस आणि हाडंदेखील चावून खावू शकत असे.” त्या म्हणाल्या दातांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण ठेवणीमुळे अन्नपदार्थांना तोंडामध्ये योग्य दिशा मिळत असे.
त्यांनी डायनोरोरच्या टायनोसोरसच्या संपूर्ण प्रजातीच्या दातांचा अभ्यास केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की टायनोसोरस रेक्सच्या दातांच्या संरचनेत सर्वांत जास्त अंतर होतं.
First Published: Tuesday, March 20, 2012, 13:51