चंद्राचं गुरुत्वाकर्षण असमान - Marathi News 24taas.com

चंद्राचं गुरुत्वाकर्षण असमान

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
चंद्राच्या विविध भागांत विविध गुरुत्वाकर्षण असल्याचा दावा काही खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. पृथ्वीच्या या एकुलत्या एक उपग्रहाच्या बदलत्या गुरुत्वाकर्षणाचं एक मानचित्रच काढल्याचा दावा या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.
 
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ (नासा)च्या लूनर रिकॉनिशॉ ऑर्बिटरमधून मिळालेल्या स्थलाकृतिक कक्षेचा वापर करून एका आंतरराष्ट्रीय संस्थेने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची संरचना समजून घेतली.
 
नव्या गुरुत्वाकर्षणाचं मानचित्र बनवणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. ख्रिश्चन हिर्ट म्हणाल्या, “आमच्या शोधातून चंद्राच्या गुरुत्व संकेतांचे सुमारे 50 टक्क्यांहूनही जास्त असे नमुने आढळले आहेत, जे यापूर्वी अस्तित्वात असूनही दुर्लक्षित राहिले होते.”

First Published: Friday, April 6, 2012, 15:53


comments powered by Disqus