आजपासून एअरटेलची '४ जी' सेवा सुरू - Marathi News 24taas.com

आजपासून एअरटेलची '४ जी' सेवा सुरू

www.24taas.com, कोलकाता
 
भारती एअरटेलने देशात पहिल्यांदाच ४ जी सेवा सुरू केली आहे. भारतात अशी सेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. आजपासून ही सेवा कोलकात्यात सुरू होत आहे. या वायरलेस तंत्रज्ञानामुळे मोबाइलचा स्पीड सध्याच्या वेगाहून १० पटीने वाढणार आहे.
 
कोलकात्यामध्ये ४ जी सेवा उपलब्ध व्हावी यासाठी तिच्या नेटवर्किंग, डिझाइन, बीडब्ल्यू नेटवर्कसाठी चीनच्या झेटीईला कंत्राट दिल्याचं एअरटेलने गेल्याच आठवड्यात घोषित केलं होतं. भारतात ३ जी प्रणाली आत्ता विकसित होत आहे. अशामध्येच एअरटेलने थेट ४ जी तंत्रज्ञान भारतात आणले आहे.
 
कोलकात्यामध्ये लॉंचिंग केल्यानंतर एअरटेल ही ४जी सेवा पुरवणारी पहिली भारतीय कंपनी ठरेल. ४ जी सेवा सुरू झाल्यावर डाऊनलोड स्पीड १०० मेगाबाइट्स प्रति सेकंद एवढा वाढणार आहे, असा दावा कंपनने केला आहे.

First Published: Tuesday, April 10, 2012, 12:07


comments powered by Disqus