Last Updated: Wednesday, April 11, 2012, 17:14
www.24taas.com, वॉशिंग्टन समुद्रातील कार्बनपासून बनणाऱ्या मिथेनमुळेच पृथ्वीचं तापमान वढतंय असा एक गैरसमज होता. मात्र आता लागलेल्या एका नव्या शोधातून असं लक्षात आलंय, की पृथ्वीवरील गरम हवामानाला पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणच जबाबदार आहे.
पृथ्वीच्या भ्रमणामुळेच पुर्वीपासून गरम हवेचं प्रमाण ५ अंश सेल्सियसने वाढलं आहे. संशोधकांनी यासाठी मोठमोठ्या खडकांमधील रासायनिक तत्वांचा अभ्यास केला. यावरून त्यांच्या असं लक्षात आलं, की ५.५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर गरम हवांचे झोत येऊन आपटले होते, त्यामुळे पृथ्वीवरील तापमान ५ अंश सेल्सियसने वाढलं होतं. यानंतरही हवेचे कमी तीव्रतेचे दोन झोत आदळले होते. यामुळे तापमान काही अंशांनी कमीही झालं होतं.
पृथ्वीच्या कक्षा ध्रुवांजळ आल्यावर गरम होऊन पेरमाफ्रॉस्ट वितळून मोठ्या प्रमाणावर ग्रीनहाऊस गॅस जमा आला असावा, असं लाइव्हसायंसमध्ये लिहीण्यात आलं आहे. पेरमाफ्रॉस्ट म्हणजे या प्रक्रियेत जमा झालेली माती होय. या मातीत मोठ्या प्रमाणावर जैविक पदार्थ आढळून येतात. अशी माती वितळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बनचं उत्सर्जन झालं. या कार्बनने सूर्यकिरणांना काही अंशी अटकाव केला, त्यामुळएच पृथ्वीवरील वातावरण गरम झालं.
First Published: Wednesday, April 11, 2012, 17:14