Last Updated: Sunday, April 22, 2012, 20:33
www.24taas.com, पॅरीस आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर डायनासोर नावाचा एक विशालकाय प्राणी अस्तित्त्वात होता. पण या विशालकाय प्राण्याचं अस्तित्वच पूर्णपणे नष्ट होण्याची कारणं काय? यावर अनेक तर्क–वितर्क आत्तापर्यंत चर्चिले जात होते. याच प्रश्नानं अनेक वैज्ञानिकांनाही कोड्यात पाडलं होतं. आता मात्र वैज्ञानिकांना या प्रश्नाचं उत्तर सापडलंय. या प्राण्याच्या शरीरचा आकारचं त्याच्यासाठी त्याचा अंत ठरल्याचं या वैज्ञानिकांना वाटतंय.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अंड्यातून बाहेर पडणाऱ्या जन्मजात डायनासोरचंच वजन १० किलोग्रॅम असायचं. त्यांच्या वाढत्या वयानुसार ते ३० ते ५० टन पर्यंत वाढायचं. छोट्या डायनासोरना वयस्कर स्तनधारी डायनासोरकडून आयर्नची मात्रा मिळायची, असा दावा ज्युरिख युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक मर्कस क्लाँस यांनी केलाय. पण या छोट्या डायनासोरला इतर मोठ्या प्राण्यांपासूनही धोका होता. आणि पृथ्वीवरून डायनासोरचं अस्तित्व नष्ट होण्यासाठी हीच गोष्ट कारणीभूत ठरली.
कोणत्याही प्रजातीच्या छोट्या जीवाला जगण्यासाठी स्थानच मिळालं नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्या तयारच कशा होणार? एक तारा पृथ्वीला येऊन धडकला आणि त्यामुळे डायनासोरचं पृथ्वीवरचं अस्तित्व नष्ट झालं, या तर्क साफ चुकीचा असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलंय
First Published: Sunday, April 22, 2012, 20:33