Last Updated: Tuesday, December 27, 2011, 12:13
झी २४ तास वेब टीम, मुंबई अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत आरआयएमचे (Research In Motion) सात हँडसेट उपलब्ध आहेत. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत ही नवी मॉडेल्स अधिक वेगवान, चांगल्या प्रकारे ब्राऊझिंगचा आनंद देणारी आणि मल्टिमीडिया उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आरआयएमचे स्मार्टफोन्स देशभरात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील.
ब्लॅकबेरी बोल्ड मध्ये टच डिसप्लेसह 9790 QWERTY कीपॅड फिचर्स आणि 1 GHz प्रोसेसर अंतर्भूत आहे. ब्लॅकबेली बोल्डमध्ये 2.45 इंच डिसप्ले, 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 8 GB ऑनबोर्ड मेमरी या फिचर्सचा समावेश असलेल्या यात आहे. या हँडसेटची किंमत २७,४९० रुपये आहेत.
कंपनीने भारतात पहिल्यांदाच ब्लॅकबेरी कर्व 9350 हा पहिला सीडीएमएवर आधारित ब्लॅकबेरी 7 स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला आहे. या हँडसेटमध्ये फ्लॅशसह 5 एमपी कॅमेरा आणि त्याची किंमत आहे २०,९९० रुपये आहे. ब्लॅकबेरी कर्व 9380 हा 3.2 इंच डिसप्ले असलेला हँडसेट २०,९९० रुपयांना उपलब्ध आहे.
First Published: Tuesday, December 27, 2011, 12:13