अॅपलचा नवा आयपॉड भारतात लाँच - Marathi News 24taas.com

अॅपलचा नवा आयपॉड भारतात लाँच

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भारतातील  अॅप्पलच्या ग्राहकांसाठी एक  खूशखबर आहे. महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर अॅप्पलने आपलं नवं आयपॉड शुक्रवारी भारतीय बाजारात आणलं, ज्याची सुरवातीची किंमत ही ३०,५०० रूपये असणार आहे.
 
नव्या रेटिना डिसप्ले असणाऱ्या या आयपॉड मध्ये अॅप्पलची नवी चीप बसविण्यात आली आहे. यात पाच मेगापिक्सलचा आयसाईट कॅमेरा देखील आहे. आयपॅड १६ जीबी, ३२ जीबी, ३२ जीबी आणि ६४ जीबी क्षमतेच्या तीन प्रकारात उपलब्ध होईल. त्याचसोबत कंपनीने आपल्या पूर्वीच्या मॉडेलमधील किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आयपॉड २ (१६ जीबी) याची किंमत आता २४,५०० इतकी असणार आहे. नव्या आयपॉडची भारतीय बाजारात किंमत ३५,५०० ते ५०,९०० इतकी असणार आहे. आयपॉडमध्ये वाय-फाय देखील असणार आहे. आणि त्यात १६ जीबी मेमरी देण्यात आली आहे. तर यात आधुनिक असं ४जी सुद्धा काम करू शकतं.
 
 
 
 
 

First Published: Saturday, April 28, 2012, 16:34


comments powered by Disqus