दिल्लीत ‘सौर कार’ साकार - Marathi News 24taas.com

दिल्लीत ‘सौर कार’ साकार


झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असताना सौर उर्जेवर चालणारी कार तयार करून दिल्ली टेक्निकल युनिर्व्हसिटीने वाहन चालकांना दिलासा दिला आहे.
अवेनीर असे या कारचे नाव असून येत्या १६ ते २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड सोलर चॅलेंजमध्ये ही कार सामील होणार आहे. ही कार डार्विन ते अडिलेड दरम्यान होणाऱ्या ३००० किलोमीटर लांबीच्या स्पर्धेतही भाग घेणार आहे.
वर्ल्ड सोलर चॅलेंजमध्ये जगभरातील नामांकित टेक्निकल युनिर्व्हसिटी आणि कॉलेज सहभाग घेतात. सौर उर्जाच्या क्षेत्रात नवनवीन शोध करणाऱ्या युनिर्व्हसिटी या स्पर्धेत भाग घेतात.
अवेनीर या कारमध्ये हाय कॅपेसिटी बॅटरीचा समावेश आहे. ही कार एक किलोवॅटपर्यंत सौर उर्जा निर्माण करू शकते आणि ८५ किलोमीटर प्रति ताशी वेगाने धावू शकते.
दिल्ली झालेल्या एका कार्यक्रमात या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सौर कारला दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

First Published: Tuesday, September 27, 2011, 11:30


comments powered by Disqus