'झी २४ तास' पाहा आता मोबाईलवरही - Marathi News 24taas.com

'झी २४ तास' पाहा आता मोबाईलवरही

www.24taas.com, मुंबई
 
बातम्या आणि वृत्तविषयक कार्यक्रमांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे पासून 'झी २४ तास' आयपॅड आणि मोबाईलवरही पाहता येणार आहे.
 
अशा प्रकारे आयपॅड आणि मोबाईलवर उपलब्ध होणारी 'झी 24 तास' ही पहिलीच मराठी वृत्तवाहिनी आहे. झी 24 तासच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा हा उपक्रम डिट्टो टि.व्हीच्या माध्यमातून मोबाईल फोन्स, टॅबलेट्स, आय़पॅड, लॅपटॉप्स आणि डेस्कटॉप्सवर उपलब्ध होणार आहे.
 
www.dittotv.com या वेबसाइटवरुन विंडोज आणि मॅकपीसीजवरुन डिट्टो टिव्ही अँप्लिकेशन डाउनलोड करण्यात येईल. तसंच डिट्टो टिव्ही अँप्लिकेशन्स मोठ्या टिव्ही शोरुम्समध्येही उपलब्ध असणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला झी 24 तासच्या या नव्या उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते झाला.
 
 

First Published: Monday, April 30, 2012, 21:26


comments powered by Disqus