फेसबुकवर शेजाऱ्यानेच टाकली अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे, minor girl porn pictures On Facebook

फेसबुकवर शेजाऱ्यानेच टाकली अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे

फेसबुकवर शेजाऱ्यानेच टाकली अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे
www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली

शेजाऱ्यांनेच बनावट प्रोफाईल फेसबुकवर तयार करून अल्ववयीन मुलीची अश्लील छायाचित्र अपलोड केलीत. तो एवढ्यावरच न थांबता त्यांने तिच्या आणि आपल्या मित्रांनाह पाठविलीत. याप्रकरणी रोहीत नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केलेय.

दिल्लीच्या आदर्शनगर भागातील रोहीतने सोशल मीडियाचा गैरवापर करीत, एका अल्पवयीन मुलीने फेसबुकवर अपलोड केलेल्या छायाचित्राना अश्लील रूप देऊन बनावट प्रोफइलद्वारे तिच्या सगळ्या मित्रानां आणि नातेवाईकांना ही छायाचित्रे पाठवली. हा सारा प्रकार त्या मुलीला तिच्या मित्रांकडून समजला. त्यावेळी या पिडीत मुलीने आदर्शनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हा प्रकार मुलीच्या शेजारीच राहणाऱ्या रोहीत नावाच्या तरूणानेच केल्याचे पोलीस तपासात अघड झाले. रोहीतवर बाल लैंगिक शोषण कायद्यानुसार ( पोक्सो) आणि माहितीतंत्र (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीतला तिहार तुरूंगात हवा खावी लागली आहे. रोहीत हा प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 17, 2014, 15:46


comments powered by Disqus