सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन याच महिन्यात भारतात, The thinnest smartphone in India this month

सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन याच महिन्यात भारतात

सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन याच महिन्यात भारतात
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

चीनी कंपनी जियोनी जगातील सर्वात कमी जाडीचा (पातळ) अॅंड्रॉईड स्मार्टफोन इलाईफ एस ५.५ लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात याच महिन्याच्या शेवटी मार्केटमध्ये मिळणार आहे.

जियोनीचा स्मार्टफोन ई -७
जियोनी ३० मार्चला गोव्यामध्ये हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ५.५ एमएम जाडीचा हा स्मार्टफोन जगातील पहिला पातळ फोन असणार आहे. या फोनच्या डिस्प्ले ५ इंचीचा असणार आहे. १.७ गीगाहर्ट्स ऑक्टा कोर प्रोसेसर असून २ जीबी रॅम, १३ मेगापिक्सल मागील कॅमेरा तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा असणार आहे आहे.

कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये या स्मार्टफोनची किंमत ३७० डॉलर आहे. मात्र, भारतामध्ये कमीत कमी २३,००० रूपये किंमत असण्याची शक्यता आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 15:46


comments powered by Disqus