Last Updated: Sunday, March 2, 2014, 07:53
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...
हा रोबो केवळ आपल्या मेंदूचा वापर करून उत्तरंच देणार नाही तर तो प्रेमही करू शकेल. गुगलचे आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स (एआय)च्या विशेषज्ज्ञांनी `द ऑब्जव्हर`शी बोलताना म्हटलंय की, आमच्या कम्प्युटनं वेबचं सगळं जग आणि प्रत्येक पुस्तकाचं प्रत्येक पान वाचायला हवंय आणि उपयोगकर्त्यांशी समजूनं घेऊन बोलणं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं यासाठी हा कम्प्युटर सक्षम असायला हवा.
त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२९ पर्यंत कम्प्युटर मशीन मानवापेक्षा जास्त समजदार असेल. त्याची बुद्धी जास्त तल्लखपणे काम करेल तसंच ही मशीन आपल्याच निर्माणकर्त्यांना मात देणारी असेल. या दिशेनं गुगलनं नुकतंच जगातील सर्वोच्च रोबोटीक कंपन्यांना खरेदी केलंय. यामध्ये बोस्टन डायनामिक्सचाही समावेश आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 2, 2014, 07:53