Last Updated: Friday, November 9, 2012, 09:20
www.24taas.com, मुंबई मोबाईल ही चैन की गरजेची वस्तू? यावर कितीही चर्चा झाली तरी ती कमी पडेल. यासोबत तो कुणी वापरावा यालाही बरीच उत्तरं आणि त्या उत्तरांचं समर्थन प्रत्येकाकडे तयार असतं. याच मोबाईलनं लहानग्यांवरही किती मोहिनी घातलीय, हे ‘एरिक्सन कन्झ्युमर लॅब’नं सादर केलेल्या अहवालात स्पष्ट झालंय.
‘एरिक्सन कन्झ्युमर लॅब’तर्फे नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलंय. यामध्ये भारतात ९ ते ११ वयोगटातील जवळजवळ तीन कोटी शाळकरी विद्यार्थी मोबाईल वापरत असल्याचं स्पष्ट झालंय. १६ शहरांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांची संख्या आहे तब्बल सात कोटी. त्यापैकी तीन कोटी मुलं ही शाळकरी मुलं आहेत. तर ब्रॉडबॅन्ड कनेक्शन वापरणाऱ्या शाळकरी मुलांची संख्या आहे जवळपास ३० लाख.
या विद्यार्थ्यांचे दिवसातले जवळजवळ सात तास फक्त मोबाईलमध्ये डोकं घालण्यात जातात. यामध्ये मोबाईलवर टीव्ही पाहणं, गेम्स खेळणं किंवा सोशल साईटवर अॅक्टीव्ह राहणं यासाठी जास्त वेळ दिला जातो. फेसबूक यामध्ये सर्वात वरच्या नंबरवर आहे.
First Published: Friday, November 9, 2012, 09:20