Last Updated: Monday, May 20, 2013, 15:22
www.24taas.com,झी मीडिया, टोकियोगेल्या वर्षी हॉलीवुडमध्ये ‘टोटल रिकॉल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यातील डगलस कॅड नावाची व्यक्तीरेखा आपल्या तळहातात असलेल्या मोबाईलवरून कॉल करतो. हे झाले चित्रपटात पण अशी काहीशी टेक्निक जपानच्या संशोधकांनी विकसीत केली आहे. येत्या एक दोन वर्षात आपण अशा प्रकारे तळ हातावर नंबर डायल करून कोणालाही फोन करून शकणार आहोत.
हायस्पीड व्हिजनचा एक खास कॅमेरा आणि दोन रोटेशन मिररच्या मदतीने ओशिकावा ओक्यू लॅबचे संशोधक मासातोशी इशिकावा आणि त्याच्या सहकार्यांनी हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.
यात एक चीप तळ हाताच्या त्वचेखाली लावली जाते. घर आणि ऑफिसात लावण्यात आलेल्या या सिस्टीम द्वारे तुम्ही हातावर नंबर डायल करू शकतात. सध्या ही सिस्टीम घरी तसेच ऑफीसमध्ये वापरण्यात येणार आहे. घराच्या बाहेर आल्यावर त्याची कनेक्टीवीटी डिसक्नेक्ट होते.
हे तंत्रज्ञान दोन मिली सेकंदात थ्री डी ऑब्जेक्टच्या हालचाली टीपू शकतात. हायस्पीड व्हिजनच्या मदतीने हे तंत्रज्ञान तळहाताखाली लावलेल्या चीपला डिटेक्ट करते. तळ हाताखाली लावण्यात येणारी चीप केवळ तीन ग्रॅमची आहे.
या नव्या फोनमध्ये तुम्हांला की बोर्डची गरज नसेल. तसेच तुम्हांला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप जवळ बाळगण्याची गरज नसेल. तुमच्या हातातच संपूर्ण जग सामावून जाईल. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणून शकतात आपला हात जगन्नाथ!
हे तंत्रज्ञान बॉलिवुडच्या चित्रपटात दाखविल्यापेक्षा अधिक अॅडव्हान्स आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, May 20, 2013, 15:22