रोमिंग फ्रीचा १० ते १५ दिवसांत निर्णय, TRAI recommendation on free roaming in 10-15 days

रोमिंग फ्रीचा १० ते १५ दिवसांत निर्णय

रोमिंग फ्रीचा १० ते १५ दिवसांत निर्णय
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने दहा दिवसाच रोमिंग फ्रीबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रव्यापी मुक्त रोमिंगवर विचारविनिमय प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पुढील १० ते १५ दिवसांत त्याबाबत शिफारसी लागू होतील.

देशात फ्री रोमिंग सुरू करण्यातसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पुरी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. फ्री रोमिंकबात विचारविनिमय सुरू आहे. ट्रायने आपल्या शिफारशी दिल्ल्यानंतर फ्री रोमिंगचा विचार केला जाईल. ऑक्टोबर पूर्वी फ्री रोमिंग सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी माहिती दिली.

फ्री रोमिंगसाठी काही नियम तयार करण्यात आले आहे. त्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे गेली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी याबाबचा निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी ही माहिती दिली.

फ्री रोमिंगमुळे टेलिफोन ऑपरेटर करणाऱ्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. मात्र, फ्री रोमिंगचा लाभ ग्राहकांना होणार आहे. ऑक्टोबर पूर्वी रोमिंग फ्री होईल. टेलिफोन ऑपरेटर कंपन्यांना १२.५ ते १५ हजार कोटींचा तोटा सहन करावा लागेल.

खासगी टेलिफोन कंपन्या आपल्या सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये जाताना काही चार्ज लावायचे. त्यामुळे एक कंपनी दुसऱ्या कंपनीची सेवा घेतल्याने अधिकचा चार्ज घ्यायचा. त्यामुळे त्याचा भार मोबाईल धारकांवर पडत होता. आता ट्रायने रोमिंक फ्री केल्यानंतर हे शुल्क कोणालाच द्यावे लागणार नाही. त्यामुळे नफा कमवणाऱ्या कंपन्या चाप बसणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 26, 2013, 10:48


comments powered by Disqus