`ट्‌विटर`चे आता `अनवॉंटेड पोस्ट`साठी `म्यूट` बटन Twitter launches mute button for annoying tweeter

`ट्‌विटर`चे आता `अनवॉंटेड पोस्ट`साठी `म्यूट` बटन

`ट्‌विटर`चे आता `अनवॉंटेड पोस्ट`साठी `म्यूट` बटन
www.24taas.com, झी मीडिया, सन फ्रान्सिस्को

सोशल नेटवर्किंगाठी प्रसिद्ध असलेल्या `ट्विटर`ने नेटीझन्सची गरज ओळखून नको असलेल्या माहितीसाठी म्हणजेच `अनवॉंटेड पोस्ट`साठी `म्यूट बटन`ची सुविधा दिली आहे.

`ट्विटर`वरील वापरणाऱ्यांना हे बटन पुढील आठवड्यापासून वापरता येणार आहे, `ट्विटर`चे निर्मिती व्यवस्थापक पॉल रोसानिया यांनी याविषयी ब्लॉगवरून ही माहिती दिलीय.

एखाद्या खातेदारकाकडून सतत पोस्ट येत असल्यास, अनेकदा नेटिझन्सला त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, यापुढे "म्यूट बटन` दाबल्यास त्यापासून सुटका होणार आहे.

खातेदाराला हवे तेव्हा "अन म्यूट बटन`द्वारे सुरू करू शकतो. आयफोन, अँड्रॉइड ऍप्लिकेशन असणारे मोबाईल व संगणकावरील विविध ब्राउजरमधून वापर करता येणार आहे.

थोडक्‍यात, एका प्रकारचे रिमोट कंट्रोलच तुमच्या हातात दिल्याचं यावेळी रोसानिया यांनी सांगितलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 21:01


comments powered by Disqus