अॅपल विरुद्ध सॅमसंगचा पेटंटवादात कोर्टानं दिला निर्णयUS jury orders smartphone maker Samsung to pay

अॅपल विरुद्ध सॅमसंगचा पेटंटवादात कोर्टानं दिला निर्णय

अॅपल विरुद्ध सॅमसंगचा पेटंटवादात कोर्टानं दिला निर्णय
www.24taas.com, वृत्तसंस्था, कॅलेफोर्निया

अमेरिकेच्या एका न्यायालयानं अॅपल कंपनीला दोन पेटंटचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात सॅमसंगला १२ कोटी डॉलर्सची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. अॅपल आणि सॅमसंग कंपनीचा पेटंटवाद हा जगभर प्रसिद्ध आहे. यातच अमेरिकेच्या कोर्टाने दिलेल्या आदेशाने पुन्हा हा वाद जगासमोर आला आहे. दोन कंपनीच्या पेटंटवादावर कॅलेफोर्नियातील कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

सॅमसंग फिचर्स पेटंट बद्दल सॅमसंगने अॅपल कंपनी विरोधात तक्रार केली होती. अॅपलने देखील सॅमसंग विरोधात फीचर्सच्या पेटंटचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात देखील कोर्टाने सॅमसंगला अॅपल कंपनीला १ लाख ५८ हजार डॉलरची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

अॅपलने पाच पेटंट बद्दल सॅमसंग कडून नुकसान भरपाई मागितली होती. तर सॅमसंग आपण काहीच चूक केलं नसल्याचं सांगत, दोन स्मार्टफोनच्या पेटंटचं उल्लंघन केल्या प्रकरणी अॅपलकडूनच नुकसान भरपाई मागितली होती. अनेक वर्षापासूनचा अॅपल विरुद्ध सॅमसंगचा हा पेटंटवाद पुढे देखील चालू राहण्याची शक्यता आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 4, 2014, 22:26


comments powered by Disqus