Last Updated: Friday, February 14, 2014, 08:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई दरवर्षी व्हॅलेंनटाईन डे ला कँफेज..गिफ्ट शॉपीज..मॉल्स..येथे तरुणांची झुंबड दिसुन येते...गिफ्ट विक्रेते आणि कॉफी शॉपही तरुणांच्या उत्साहात भर घालण्यासाठी विशेष प्रयत्न करतात...आता मात्र या तरुणाईच्या उत्साहात भर टाकण्यासाठी अँड्रॉइजने ही व्हँलेंनटाईन डे नावाने अँप विकसित केलंय. तर महाराष्ट्र सरकारच्या व्यसनमुक्ती अभियानाचा ब्रँड एम्बॅस्डर अभिनेता सिद्धार्थ जाधावने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचा सल्ला दिलाय.
व्हॅलेंटाईन डे चा आनंद एका दिवसापूरता मर्यादित न राहता आयुष्यभर टिकावा यासाठी ठाण्यात अनोखा उपक्रम करण्यात आला. ज्यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झालीत अशा ५० जोडप्यांची पुन्हा लग्न लावली. या विशेष कार्यक्रमात जिद्द या गतीमंद शाळेतले विद्यार्थीही सहभागी झाले होते. या अनोख्या लग्न सोहळ्यासाठी ठाणेकरांनीही मोठी गर्दी केली होती.
आपल्या प्रिय व्यक्तीपुढे मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची वाट तरुणाई अतुरतेनं पाहत असते. मात्र हा दिवस आल्यावर आपल्या व्हँलेंटाईनसाठी नक्की काय प्लँन करायचा असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.. आता हा प्रश्व सुटणार आहे.कारण व्हॅलेंटाईन डे साठी खास अँप विकसीत करण्यात आलंय
केवळ व्हॅलंटाईन डेचं सेलिब्रेशनच नाही तर काय गिफ्ट द्यायचं, व्हॅलेंटाईनच्या पार्टीसाठी कसं रेडी राहयचं या सगळ्या टीप्स यामध्ये मिळतील. खास व्हँलेनटाईनसाठी विकसीत करण्यात आलेले ही अँपस गुगल प्ले स्टोअर वरुन अगदी मोफत डाऊनलोड करु शकता... एकदा ऍप डाउलोड केल की त्यानध्ये व्हँलेनटाईन मेसेजेस..गिफ्ट आयडियाज..लव्ह रिंगटोन..वॉलपेपर...असे कित्येक ऑप्शन्स आपल्याला मिऴतील..
या शिवाय ग्रिटींग्स, गिफ्ट आँर्डर्स, तसंच आपल्या स्पेशल व्यक्तीला कस सरप्राईज करायाच असे शेकडो आँप्शन्स आहेत. हे अँप केवळ प्रेमी युगलांसाठी नाहीये तर..सिंगल लोकांसाठीही अनेक व्हँलेंनटाईन डे आयडीयाज या अँप वर आहेत... त्यामुऴे यंदाचा व्हँलेंनटाईन डे सिंगल्ससाठी देखील स्पेशल असेल यात शंका नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 08:38