Last Updated: Thursday, January 16, 2014, 09:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईभारतात वोडाफोननं k4201 हे ३जी डोंगल लॉन्च केलंय. पोस्टपेड कस्टमर्ससाठी या डोंगलची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. या डोंगलमध्ये २१.१ एमबीपीएसपर्यंत डाऊनलिंक स्पीड आणि ५.७६ एमबीपीएसपर्यंत अपलिंक स्पीड मिळेल. हा काळा, लाल आणि ड्यूएल टोन (पांढरा आणि लाल) रंगांमध्ये मिळेल.
कंपनीनं म्हटलं, ३जी प्लान ६५० रुपये, ७५० रुपये आणि ८५० रुपयांमध्ये १२ महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला १०० रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.
कंपनीनं अॅडवॉन्स्ड रेंटल प्लान पण सुरू केलाय. ज्यात ग्राहकाला ६ महिन्याचे पैसे दिल्यास दोन महिने फ्रीमध्ये मिळतील आणि ग्राहक सहा महिन्यांच्या पैशात डोंगल ८ महिने वापरतील. ही ऑफर ६५० रुपये, ७५० आणि ८५० रुपयांच्या तीन पोस्टपेड प्लान्सचा समावेश आहे.
वोडाफोन K४२०१ ३जी डोंगलमध्ये मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट सुद्धा आहे. ज्यात ३२ जीबीपर्यंतचा कार्ड लावता येतो. यात मेमरी कार्ड टाकून डोंगलचा वापर पेन ड्राईव्हसारखाही केला जावू शकतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 09:59