`व्हॉटस् अप` मोबाईल कंपन्यांना दणका देणार?, voice call facility by whats app

`व्हॉटस् अप` मोबाईल कंपन्यांना दणका देणार?

`व्हॉटस् अप` मोबाईल कंपन्यांना दणका देणार?

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मोबाईल चॅटींगची सुविधा उपलब्ध करून देणारं `व्हॉटस अप` आता ग्राहकांना एक `गुड न्यूज` देण्याच्या तयारीत आहे. व्हॉटस् अप लवकरच व्हॉईस कॉलिंगची सुविधा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पण, `व्हॉटस् अप`च्या या घोषणेमुळे मोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

ऑनलाईन मोफत मॅसेजिंगची सुविधा उपलब्ध करून देणारं `व्हॉटस अप` सध्या तरुण-तरुणींची मैत्री चांगलीच घट्ट झालीय. याच `व्हॉटस अप`च्या व्हॉइस कॉलिंगची तांत्रिक कामं आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहेत. काही महिन्यांपूर्वीच `फेसबुक`नं `व्हॉटस अप` विकत घेतलं होतं. त्यानंतर व्हॉटस अपनं व्हॉइस कॉल सुविधा देण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं. कंपनीने हिंदी आवाजांवर काम करून व्हॉइस डेटा बॅकअप तयार केला आहे. मात्र परफेक्शनच्या दृष्टीने कंपनीने पुन्हा एकदा हा व्हॉइस डेटा तपासून पाहण्यास सुरुवात केली आहे. हाच डेटा व्हॉइस कॉलिंगसाठी वापरला जाणार आहे. सामान्यपणे वापरण्यात येणारे हॅंगअप आणि इनकमिंग कॉलसारख्या शब्दांचे व्हाइस कॉलिंगसाठी हिंदीत भाषांतर करण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.

`व्हॉट्सअॅप` हे फ्री मेसेजिंग अॅपच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आहे. दररोज ४६ कोटीहून अधिक युझर्स व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपची व्हॉइस कॉलिंग सुविधा सर्वप्रथम अँड्रॉइड, मग आयओएस आणि त्यानंतर विंडोज, ब्लॅकबेरी मोबाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती व्हॉट्सअॅपचे सीईओ जॅन कूम यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या परिषदेत दिली आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 22, 2014, 15:53


comments powered by Disqus