पाहा... गुगलचा डान्सिंग व्हिडिओ डूडल, Watch: Google Doodle video tribute to Saul Bass

पाहा... गुगलचा डान्सिंग व्हिडिओ डूडल

पाहा... गुगलचा डान्सिंग व्हिडिओ डूडल
www.24taas.com, मुंबई

आज अमेरिकन ग्राफिक डिझायनर आणि हॉलिवूड चित्रपट निर्माते सौल बास यांचा ९३ वा जन्मदिवस... गुगलनं बास यांना आपल्या अनोख्या गुगल डूडलच्या साहाय्यानं आदरांजली वाहिलीय.

डूडलवर आज एक व्हिडिओ दिसतोय जो १ मिनिट २० सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ बास यांनी केलेल्या काही उल्लेखनीय ग्राफीक्सचा समावेश करून बनवण्यात आलाय. सोबतच अमेरिकन ‘जाझ कम्पोझर’ डेव ब्रुबेक यांच्या म्युझिकचा यात वापर करण्यात आलाय.

आपल्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये बास यांनी हॉलिवूडचे अनेक उल्लेखनीय चित्रपट निर्माते... हिचकॉक, ओटो प्रिमिंगर, बिली वाइल्डर, स्टनली कुब्रिक आणि मार्टीन स्कोर्सस यांच्यासोबत काम केलं. तसंच बास यांनी उत्तर अमेरिका, बेल (१९६९), ग्लोब (१९८३) यांच्या लोगोजचं डिझाईनही केलं. जे आता त्यांची ओळख बनलीय.

गुगल डूडलचा व्हिडिओ इथे पाहा :

First Published: Wednesday, May 8, 2013, 10:42


comments powered by Disqus