महिलांना कधी येते अक्कल? Men get matured at 43!

महिलांना कधी येते अक्कल?

महिलांना कधी येते अक्कल?
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

महिला साधारणतः पुरुषांच्या वागण्यावर बालिशपणाचे आरोप करतात. मात्र संशोधकांनी या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या संशोधनामध्ये समोर आलं आहे, की पुरुषांना ४३ वर्षांचं झाल्यावर अक्कल येते. तर महिलांना पुरुषांच्या अकरा वर्षं धीच अक्कल येते. साधारण वयाच्या ३२ व्या वर्षी महिलांमध्ये प्रगल्भता येते. असं संशोधनात मह्टलं आहे.

यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक दहापैकी ८ महिलांच्या बोलण्यात पुरूषांचं वागमं बालिश वाटत असल्याचं म्हटलं जातं. पुरुषांच्या वागण्यात बरीच वर्षं काहीही बदल होत नाही. लहान मुलांसारख्या आवडी-निवडी असणं हे पुरुषांच्या बालिशपणाचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओ गेम खेळणं आणि फास्ट फूड खाणं यांसारख्या क्रिया करताना पुरुषांमधील बालिशपणा प्रकर्षाने जाणवत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं.

डेली मेल मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भांडण केल्यावर रुसून बसणं, अन्न तयार करताना उतावळेपणा करणं, अश्लील विनोदांवर खो खो हसणं, बेदरकारपणे गाडी चालवणं हे सर्व बालिशपणा न गेल्याचं लक्षण मानलं जातं. महिलांच्या उत्तरांमधून असं दिसून आलं आहे की महिलांना अशा पुरुषांची लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पुरुषांचा विकास धीम्या गतीने का होतो, याचं संशोधन सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 17:22


comments powered by Disqus