Last Updated: Friday, October 26, 2012, 10:42
www.24taas.com, मुंबई मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे विंडोज-8 ही नवी ऑपरेटिंग सिस्टम बाजारात दाखल झालीये. गेल्या अनेक दिवसांपासून वेबदुनियेत याची चर्चा होती. या नव्या सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने नव्या उत्साहाने पुन्हा एकदा बाजारात पाऊल टाकलंय.
कॉप्युटर, स्मार्टफोन, टॅब्लेट पीसी, टचस्क्रीन फोन, लॅपटॉप आदी नवनवीन गॅझेटसाठी ही नवी सिस्टम उपयुक्त ठरणार आहे. दीर्घकाळ चालणारी बॅटरी, वेगवान बूटिंग आणि आकर्षक डिझाईन ही या विंडोज-8 ची खास वैशिष्ट्य म्हणावी लागतील. विंडोज-8 आणि सरफेस टॅब्लेटच्या विक्रीला आजपासून सुरुवात झालीये.
First Published: Friday, October 26, 2012, 10:39