सावधान! चॅट अॅपद्वारं चीनची भारतावर नजर With the help of Chat app China`s eye on India

सावधान! चॅट अॅपद्वारं चीनची भारतावर नजर

सावधान! चॅट अॅपद्वारं चीनची भारतावर नजर
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

मोबाईल सेवा अत्याधुनिक होता होता, त्यात अनेक अॅपचा समावेश वाढला. आपण आवडीनं ते अॅप डाऊनलोड करू लागलो. मात्र भारतीय मोबाईल धारकांनो सावधान! आपण बिनधास्त पणे वापरत असलेल्या चॅट अॅपवर चीनची नजर आहे.

चॅट अॅपच्या मदतीनं चीन तुमची सगळी माहिती गोळा करुन भारतावर नजर ठेवत असल्याची धक्कादायक माहिती. ‘द हॅकर्स’ या परिषदेत सायबर सुरक्षा संशोधकांनी उघड केलीय. दिल्लीत आयोजित दुसऱ्या ‘हॅकर्स’ परिषदेत चॅट अॅपच्या साहाय्यानं भारताची गोपनीय माहिती चीन सरकार मिळवत असून देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवत असल्याची माहिती सायबर सुरक्षा तज्ज्ञ जितेन जैन यांनी दिली.

चीनच्या सर्व्हरवर चॅट अॅप वापरणाऱ्यांची माहिती दिसते, असं त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे या परिषदेला चीनी कंपनीचे भारतातील प्रतिनिधीही उपस्थित होते. आता सायबर सेल यावर काय पाऊलं उचलते हे बघणं औत्युक्याचं ठरेल. कारण, त्यावरच चॅट अॅपचं आणि भारतीयांचं भविष्य अवलंबून आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 12:06


comments powered by Disqus