झोलो 8 मेगापिक्सलचा स्वस्त फोन,Xolo Q700S with Android 4.2,quad-core processor launched at Rs. 9,999

'झोलो'चा 8 मेगापिक्सलचा स्वस्त Q700S लॉन्च

'झोलो'चा 8 मेगापिक्सलचा स्वस्त Q700S लॉन्च
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झोलोचा Q700S ऑफिशली लॉन्च झाला आहे. त्याची किंमत ९९९९ रुपये असून गेल्या आठवड्यात अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

झोलो Q700S हा फोन ड्यूअल सीम सपोर्ट करीत असून यात 854x480 पिक्सल्सच्या रेझ्युल्यूशनचा 4.4 इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे. यात १.३ गीगाहर्ट्स प्रोसेसर, पॉवर वीआर जीपीयू आणि १ जीबी रॅम आहे. हा फोन अँड्रॉइड ४.२ जेली बीनवर चालतो.

यात मागे एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्स कॅमेरा असून समोर 0.3 मेगा पिक्सल कॅमेरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून 32 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डापर्यंत मेमरी एक्सटेंड करू शकतो.

बॅटरी 1800mAh ची असून कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये 3G, वाई-फाई, ब्लूटूथ 3.0, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएसचा समावेश आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 20, 2014, 18:23


comments powered by Disqus