वार्षिक बेसिक पगार १२ लाख डॉलर yearly basic payment 12 lakha dollar

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांचा पगार किती?

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांचा पगार किती?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सत्या नडेला आता त्या खुर्चीवर बसणार आहेत, जेथे कधी काळी मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेटस बसत होते.

मायक्रोसॉफ्ट चालवण्यासाठी सत्या नडेला पेक्षा आणखी दुसरा कुणी असू शकत नाही, असं बिल गेटस यांनी म्हटलं आहे.

सत्या नेडला यांचा पगार किती आहे, आणि काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू?

उच्च शिक्षित
मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सत्या नडेला यांनी मंगलोर युनिवर्सिटीतून १९८८ मध्ये इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंगची डिग्री घेतली.

यानंतर त्यांनी अमेरिकेच्या विस्कॉन्सिन-मिलवॉकी युनिवर्सिटीत कंम्प्युटर सायन्सची डिग्री घेतली, शिकागो युनिवर्सिटीत एमबीए केलं.

क्लाउड गुरु
सत्या नडेलाला क्लाऊड गुरूही म्हणतात, क्लाऊड सेवा म्हणजे, इंटरनेटवरील फाईल ज्या जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून पाहता येऊ शकतात, किंवा त्यांच्यावर काम करता येऊ शकतं. ही सेवा पूर्णपणे इंटरनेटवर चालते.

सत्याने एमएस ऑफिस क्लाऊडवर आणण्याची महत्वाची भूमिका बजावली. मायक्रोसॉफ्टटी क्लाउड सेवा अजूरला प्रस्थापित सेवेत आणण्यासाठी नडेला यांचं योगदान फार महत्वाचं आहे.

मायक्रोसॉफ्टची ऑफिस ३६५ सेवा चांगलीच लोकप्रिय आहेय

मायक्रोसॉफ्टच्या सेवेत २२ वर्ष
सत्या नडेला हे १९९२ पासून मायक्रोसॉफ्टशी जोडले गेले आणि त्यांनी महत्वपूर्ण उत्पनांची निर्मिती केली. यात विंडो सर्वर, डेव्हलपर्स टूल, अजूर आणि बिंग यांचा समावेश आहे.

माइक्रोसॉफ्ट आधी सन
नडेला या आधी सन मायक्रोसिस्टीममध्ये काम करत होते. आता मायक्रोसिस्टम ओरॅकलच्या मालकीची आहे.

मायक्रोसॉफ्टचे तिसरे सीईओ
सत्या नडेला मायक्रोसॉफ्टच्या ३८ वर्षांच्या इतिहासात तिसरे सीईओ आहेत. याआधी स्टीव बामर, आणि कंपनीचे संस्थापक बिल गेटस यांच्याकडे हे पद होतं.

क्रिकेटचा फॅन
सत्या नडेला यांना क्रिकेट आवडतं, शाळेत असतांना टीममध्ये त्यांचा समावेश होता, तेव्हा टीमचं नेतृत्व आणि व्यवस्थापनाचे अनुभव आल्याचं नडेला म्हणतात.

शिकण्याची भूक
सत्या नडेला म्हणतात, माझे मित्र मला व्यवस्थित ओळखतात, त्यांना माहित आहे, मला नेहमी कुतूहल असतं, शिकण्याची उत्कंठा लागून असते, मला ज्ञानाची भूक असते, मी जेवढे पुस्तक वाचतो, त्यापेक्षा जास्त खरेदी करतो. मी जेवढे ऑनलाईन कोर्स करतो, त्यापेक्षा अधिक कोर्सेसना प्रवेश घेतो.

बालपणाच्या मैत्रिणीशी लग्न
ज्या वर्षी नडेला मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला लागले, त्या वर्षीचं त्यांनी आपली बालपणाची मैत्रिण अनुपमाबरोबर लग्न केलं. अनुपमा आणि सत्या यांचे वडिला भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते.नडेला आणि अनुपमा यांना दोन मुलं आहेत.

पगार
मीडियात आलेल्या बातम्यांनुसार सीईओ सत्या नडेला यांना १२ लाख डॉलर वार्षिक पगार आहे. या आधी स्टीव बामर सीईओ होते, त्यांच्यापेक्षा हा पगार ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. १२ लाख डॉलर हा बेसिक पगार आहे. बोनस आणि इतर नफा मिळाल्यानंतर त्यांचा पगार ८० लाख डॉलरपर्यंत जाऊन पोहोचणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 18:28


comments powered by Disqus