Last Updated: Tuesday, April 15, 2014, 21:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबहुप्रतिक्षीत गूगल ग्लास विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, या ग्लासची किंमत 1500 डॉलर असणार आहे, भारतीय चलनानुसार या चष्म्याची किंमत 90 हजार रूपये आहे.
या ग्लासची खासियत अशी आहे की, या द्वारे तुम्ही तुमचे ईमेल वाचू शकतात. हा चष्मा म्हणजेच गूगल ग्लास फक्त एक दिवस विक्रीसाठी असेल. या ग्लासमधून तुम्ही ईमेल वाचू शकतात, चित्र पाहू शकतात आणि रस्त्यांची माहितीही मिळवू शकतात.
या चष्मातून तुम्हाला फोटोही काढता येतील तसेच व्हिडीओही चित्रित करता येणार आहे. म्हणजेच यात कॅमेऱ्याचे सर्व फीचर उपलब्ध आहेत. गूगल ग्लास फक्त एका दिवसासाठी बाजारात येणार आहे.
कंपनी यानंतर आपल्या योजनेविषयी माहिती देणार आहे. विशेष म्हणजे गूगल ग्लास हा फक्त ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे, सुरक्षा कारणावरून हा लहान मुलांना देता येणार नाहीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 15, 2014, 21:35