Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॅँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरुन रोख रक्कम मिळवणं लवकरच शक्य होणार आहे. रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे स्पष्ट केलंय.
सध्या केवळ बॅँकेत खात्याबरोबरीने एटीएम कार्ड बाळगणाऱ्या धारकानांच ही सुविधा शक्य आहे. आता नव्या पद्धतीनुसार या प्रक्रियेसाठी मध्यस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जे पैसे प्राप्त करणा-या व्यक्तीच्या मोबाईलवर विशिष्ट कोड नंबर पाठवतील. त्या कोड नंबरच्या साह्यानं जवळच्या एटीम सेंटरमध्ये रोख रक्कम मिळवता येईल.
या व्यवहारात ग्राहकाची अस्सलता, ओळख, उलाढालीची वैधता या सारख्या सुरक्षाविषयक बाबींची काळजी घेण्यासाठी नासकॉमच्या तंत्रज्ञांना मदतीचे आवाहन राजन यांनी केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 08:13