फेसबुकचं व्यसन जडलयं तरूणाईला...., youth facebook addiction

फेसबुकचं व्यसन जडलयं तरूणाईला....

फेसबुकचं व्यसन जडलयं तरूणाईला....
www.24taas.com, लंडन

फेसबुक म्हणजे तरूणाईचं हक्काचं व्यासपीठ झालं आहे... तुम्ही दिवसभरात नक्की काय करता, तुमचे फोटो, चॅटींग, डेटिंग असे सगळे प्रकार फेसबुक सुरू असतात. आणि तरूणाई त्यात अक्षरश: गढून गेलेलं असतात. पण आता हेच फेसबुक एक प्रकारचं व्यसन झालं आहे.

सकाळ-सायंकाळ फेसबुकवर चॅटिंग आणि डेटिंग करणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले असून फेसबुकचे फॅन असलेली काही तरुण मंडळी तर दिवसातले चक्क आठ तास फेसबुकवर सर्फिंग करण्यात घालवत असल्याचे एका रिसर्चमधून समोर आले आहे.

लंडनमध्ये झालेल्या या रिसर्चनुसार १८-२५ वयोगटातील नऊ जणांपैकी एक जण दिवसातून २० वेळा फेसबुक चेक करतात.

First Published: Wednesday, September 12, 2012, 14:37


comments powered by Disqus