Last Updated: Monday, April 1, 2013, 16:42
www.24taas.com, न्य़ूयॉर्कतमाम इंटरनेट प्रेमींची लाडकी व्हिडिओ वेबसाइट यूट्युब बंद करण्यात येणार असल्याची घोषणा एका व्हिडिओद्वारे यूट्युबनेच यूट्युबवर केली आहे. या घोषणेमुळे कालपासून टेक्नोसॅव्ही लोक हैराण झाले आहेत.
यूट्युब सुमारे दशकभरासाठी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या युट्यूबवर अपलोड केल्या गेलेल्या व्हिडिओंपैकी सर्वांत चांगला व्हिडिओ कुठला याची स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्याचा निकाल घोषित करून यूट्युब बंद करण्यात येत असल्याचं युट्युबच्या प्रतिनिधींनी ताडे तीन मिनिटांच्या व्हिडिओत सांगितलं आहे. आज दिवसाअखेरीस युट्यूब बंद करण्यात येणार आहे. २०२३ मध्येच विजेत्याची घोषणा करण्यात येणार असल्याचं युट्युब कडून सांगण्यात येत आहे.
आज १ एप्रिल असल्यामुळे युट्युब एप्रिल फूल तर करत नाही ना अशी शंका बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित झाली आहे. मात्र युट्युबने अद्याप हे खरंच होणार आहे की ङे एप्रिल फूल आहे, यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही.
First Published: Monday, April 1, 2013, 16:42