Last Updated: Thursday, March 7, 2013, 17:07
www.24taas.com, नालासोपारानालासोपारा-वसई लिंक रोडजवळील युनियन बँकेसमोर अज्ञात इसमांनी ज्वेलर्सच्या मालकाला आणि कामगाराला बंदुकीचा धाक दाखवून एक किलो सोनं लुटलं.
नालासोपा-यातील आचोळे रोडवरील सलोनी ज्वेलर्स दुकानाचे मालक सुनील जैन आणि संतोष जैन हे जात असताना रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. वसई लिंक रोडवरून जात असताना अचानक स्कॉर्पिओ गाडीनं युनियन बँकेसमोर धडक मारली आणि त्यांच्याकडील सोन्यानं भरलेली बॅग लंपास केली.
संतोष जैन यांनी प्रतिकार करताच त्यांच्या चेह-यावर आणि हातावर चाकूने वारही केले. तर, सुनिल जैन यांच्या डोक्यावर बंदुकीनं जोरदार प्रहारही केला. तसंच, त्यांनी दोन राऊंड फायरिंगही केलं. दरम्यान, संतोष जैन यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना मिरा रोडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
First Published: Thursday, March 7, 2013, 16:56