मुरूडमध्ये चक्क चौदा कुटुंबांवर बहिष्कार , 14 families to boycott Panchayat on being in Murud

जातपंचायतीचं भूत, मुरूडमध्ये चक्क चौदा कुटुंबांवर बहिष्कार

जातपंचायतीचं भूत, मुरूडमध्ये चक्क चौदा कुटुंबांवर बहिष्कार
www.24taas.com, झी मीडिया, अलिबाग

जातपंचायतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिल्यानंतर राज्यभरात एका मागून एक धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. रायगड जिल्ह्यात तर जात पंचायतीच्या जाचक निर्णयाने उच्छाद मांडला आहे. चक्क मुरूड सारख्या पर्यटन शहरामध्ये दोन वर्षांपासून चौदा कुटुंबांना यामुळे नरक यातना भोगाव्या लागत आहेत.

देशातसह विदेशातील पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षीत करणारे पर्यटन स्थळ म्हणजे रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजीरा. मात्र, या पर्यटन स्थळाला सद्या ग्रहण लागलं आहे ते समाजिक पबिष्काराचं. इथल्या चौदा कुटुंबांना शुल्लक कारणावरून दोन वर्षापासून जातपंतायचतीने बहिष्कृत केल्यानं त्यांचं जिवन जगणं मुश्कील बनलं आहे.

बहिष्कृत प्रकाश पाटील हे त्यावेळी नगरसेवक आणि स्थानिक शिक्षण मंडळावरती सभापती असल्याने त्या शाळेत जाण्यास मुलांवर बंदी घालण्यात आली. तर एका कुटुंबाने बहिष्काराचे नियम पाळले नाही म्हणून दोन वर्षांपूर्वी जमावाने हल्ला करून मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू झाला.

याबाबत झी मीडियाने पंच कमिटीशी संपर्क साधला. कुटुंबांवर बहिष्कार टाकला नसून ते कुटुंब स्वतःहून बाहेर गेल्याचा दावा त्यांनी केला. तर पोलीसांनी याबाबत रितसर ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

मुरूड शहराला जसं निर्सगाने भरभरून दिलं आहे. तसंच ऐतिहासिक महत्त्व देखील असल्याने हे शहर नावा रूपाला आलं. मात्र, कोळी वाड्यातील सामाजिक बहिष्काराच्या अघोरी कृत्याने इथल्या परंपरेला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकारामागे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चाही दबक्या आवाजात ऐकायला मिळत होती. त्यामुळे हे बहिष्काराचं ग्रहण सुटणार कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 11:11


comments powered by Disqus