Last Updated: Sunday, August 12, 2012, 07:29
www.24taas.com, ठाणेमीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार संपलाय. रविवारी महापालिकेच्या 45 प्रभागांच्या 95 जागांसाठी मतदान होणाराय. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर आपल्याच पक्षाची सत्ता येणार असा दावा उमेदवारांनी केलाय.
मीरी बाईंदर महापालिकेच्या निवडणूकाचा प्रचार आता संपलाय. या निवडणूकीत 516 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलीय. या निवडणूकीत दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठीचा आदेश झुगारुन स्वबळावर निवडणूक लढायचा निर्णय घेतलाय. तर सेना भाजप ऐआणि रिपाईची महायुती झाली आहे. बहुजन विकास आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. मीरा भाईंदर मतदार संघात मराठी मतदार नसल्याने मनसेला तारेवरची कसरत करावी लागणाराय. यंदाच्या निवडणूकीत काँग्रेस 94, राष्ट्रवादी 84, सेना 39, भाजप 52, रिपाई 5, मनसे 58, बहुजन विकास आघाडी 51, अपक्ष आणि इतर 133 असं चित्र आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीनंतर सर्वच पक्षांना आपलीच सत्ता येईल असा आत्मविश्वास वाटतोय. ठाण्यानंतर मीरा भाईंदर काबीज करण्याचा विश्वास भाजप नेत्यांना वाटतोय.
First Published: Sunday, August 12, 2012, 07:29