पुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी6 tourists from pune immerse in Ratnagiri, growing number

पुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी

पुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले इथं पुण्यातल्या 6 पर्यटकांना जलसमाधी मिळालीय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. हे सर्व पर्यटक पुण्याहून कोकणात फिरायला आले होते.

14 पर्यटकांपैकी 9 जण आंजर्ले खाडीत पोहायला गेले असता पाण्याच्या प्रवाहानं 6 जण बुडाले, तर तिघं किनाऱ्यापर्यंत पोहोचले. जलसमाधी मिळालेल्या सहा पैकी तीन लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मृतकांची नावं

श्रृती डांगे (13 वर्षे), पवन डांगी(6वर्षे) आणि संगिता ओझा (34 वर्षे), सविता डांगी (24) मृतांची नावं आहेत. तर श्याम डांगी (27)आणि अपर्णा शर्मा (8) हे दोघं अद्याप बेपत्ता आहेत. हे सर्व पुण्यातल्या दत्तवाडी पानमला इथले रहिवासी आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 25, 2014, 18:06


comments powered by Disqus