Last Updated: Monday, February 17, 2014, 16:54
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेएका ६० वर्षीय नराधमाने बारा वर्षीय मुलीवर मीरारोडमध्ये वारंवार अत्याचार केल्याची घटना मागील रविवारी ठाण्यात उघडकीस आली. पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केल्याने ती सात महिन्यांची गरोदर राहिली असून उपचारांसाठी तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर मुलीवर अत्याचार करणारा हा नराधम कुटुंबासह फरार झाला आहे.
आई लहानपणीच पीडित मुलगी वडिलांसह मीरारोड येथे राहत होती. ड्रायव्हर असलेल्या तिच्या वडिलांना वारंवार बाहेर राहावे लागे. त्यामुळे आपल्या मुलाली ते सुलभ स्वच्छतागृहाचा ठेका घेतलेल्या आणि या स्वचछतागृहाच्या वरच राहणाऱ्या प्रधान काका नावाच्या ६० वर्षीय इसमाकडे ठेवत असे.
त्यासाठी त्याला पैसेही देत असत. मात्र परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या आरोपीने गुंगीचे औषध देऊन तसेच धमकावून मुलीवर वारंवार अत्याचार केला. यात त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली. घाबरून गप्प बसलेल्या मुलीने अखेर त्रास असह्य झाल्यावर हा सर्व प्रकार परिसरातील एका महिलेला सांगितला.
तिने मुलीच्या वडिलांना सांगितल्यानंतर ते जून महिन्यात त्यांनी कनाकिया पोलिस स्टेशनात तक्रार करायला गेले, मात्र त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. आरोपीच्या अत्याचारांमुळे ही मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली आहे. रविवारी सकाळी पीडित मुलीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 17, 2014, 15:55