Last Updated: Wednesday, February 5, 2014, 14:56
www.24taas.com, वृत्तसंस्था, आसनगावआपल्या प्रेमप्रकरणाबद्दल काकानं विचारलेला जाब आणि त्यांनी केलेली मारहाण याचा राग मनात धरून आसनगाव इथं एका १५वर्षीय तरुणीनं अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. यात ती ९0 टक्के भाजली असून, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बामणे इथल्या शाळेत इयत्ता आठवीत शिकणार्या एका विद्यार्थिनीचं शेजारीच राहणार्या एका तरुणावर प्रेम होतं. हे तिच्या काकानं पाहिल्यावर त्यांनी तिला याबाबत चांगलंच रागवलं. यात तिला त्यांनी मारहाणही केली. हाच राग मनात धरून तिनं पेटवून घेतलं.
मात्र काकानंच आपल्या अंगावर रॉकेल टाकून पेटविलं, असा जबाब तिनं पोलिसांना अत्यवस्थ अवस्थेतच दिल्यानं राजाराम फराड (४५) याला पोलिसांनी अटक केली आहे. तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 5, 2014, 14:56