नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर घरातच अॅसिड हल्लाAcid attack on Minor girl in nalasopara

नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर घरातच अॅसिड हल्ला

नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर घरातच अॅसिड हल्ला
www.24taas.com, झी मीडिया, नालासोपारा

एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडलीय. नवव्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीच्या अंगावर अज्ञात व्यक्तीनं अॅसिड फेकलं.

ही मुलगी आपल्या घरात अभ्यास करत असताना या व्यक्तीनं खिडकीतून तिच्या अंगावर अॅसिड फेकलं. मात्र सुदैवानं ते अॅसिड पुस्तकं आणि बॅगवर पडल्यानं मुलगी बचावलीय. या मुलीला कोणतीही इजा झालेली नाही.

अॅसिड फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगी राहत असलेल्या विजयनगर भागात वीज नव्हती. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत या अज्ञात व्यक्तीनं हे कृत्य केलंय. या घटनेमुळं महिला आणि मुली आता स्वतःच्य़ा घरातही असुरक्षित असल्याचं समोर आलंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 28, 2013, 15:46


comments powered by Disqus