कांदा पुन्हा रडवणार, तीन महिन्यानंतर महागणार, After three months onion rate increase

कांदा पुन्हा रडवणार, तीन महिन्यानंतर महागणार

कांदा पुन्हा रडवणार, तीन महिन्यानंतर महागणार
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

सध्या मार्केटमध्ये कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांद्यांचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळे येत्या तीन महिन्यात कांदा महागण्याची शक्यता आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे महाराष्ट्रात पिकांचं अतोनात नुकसान केलं. यांत कांदा पिकालाही मोठा फटका बसलाय. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात निघणारं कांद्याचं उत्पादन पावसाळ्यासाठी साठवलं जातं. मात्र गारपीट आणि अवकाळी पावसामुळं कांद्याचं पीक कमी आलंय. जे आलंय तेही कमी दर्जाचे असल्यानं हा कांदा जास्त काळ टिकू शकत नाही.. त्यामुळं आगामी काळात कांदा रडवणार असल्याचं बोललं जातंय..

हा कांदा कमी दर्जाचा असल्यानं तो निर्यातही करता येत नाही. सध्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त कांद्याची आवक होत असून आठ ते चौदा रुपये किलोपर्यंत कांदा मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

पावसाळ्यासाठी जेवढ्या कांद्याची साठवणूक व्हावी तेवढी होत नसल्यानं आगामी काळात कांदा महागण्याची शक्यता आहे. ऐन विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याच्य़ा काळात कांदा महागणार असल्याचे संकेत मिळत असल्याने सरकारनं आधीच उपाययोजना करावी अशी मागणी आता होतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 08:32


comments powered by Disqus