अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला वेगळ वळण, Archana kothavade kidnapping & Election

अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला वेगळ वळण

अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला वेगळ वळण
www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

कल्याण-डोंबिवली मनपाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला आता वेगळ वळण आलंय. अर्चना कोठावदे यांनी माझं अपहण झालं नसून मी सुखरूप असल्याचा खुलासा केलाय.

सध्या त्या म्हैसूर-बंग्लोरला असून या सा-या अपहण नाट्याला आमदार रविंद्र चव्हाण यांना जबाबदार धरलंय.. एस.एम.एसच्या माध्यमातून त्यांनी हा खुलासा केलाय.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक आज मंगळवारी होत आह़े मात्र सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याने शिवसेना-भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. तर मनसे व काँग्रेस नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर स्थायी समिती सभापतीपद बळकावण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान, कोठावदे यांनी मात्र आपण कौटुंबिक कामानिमित्त राज्याबाहेर गेल्याचे कळविले आह़े त्यामुळे या प्रकरणातील संभ्रम आणखी वाढला आह़े. त्यातच सावरकर नगर प्रभागाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे शुक्रवारपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार भाजपने रामनगर पोलीस ठाण्यात केली होती़. त्यामुळे त्यांचे अपहण झाल्याची चर्चा होती. त्यांच्या खुलाशामुळे या अपहण नाट्याला आता वेगळ वळण आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 11:45


comments powered by Disqus