Last Updated: Saturday, March 23, 2013, 20:52
www.24taas.com, ठाणेएटीएसचे उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी ठाण्यात आत्महत्या केलीये. घोडबंदर रोडच्या गोवा पोर्तुगिजा हॉटेलमध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बॅनर्जी दुपारी सहकुटुंब जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. जेवणाच्या टेबलवरच त्यांनी गोळी झाडून घेतली. या घटनेमुळं संपूर्ण ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
१९९५ साली पोलीस दलामध्ये संजय बॅनर्जी रुजू झाले. बॅनर्जी प्रमोटेड आयपीएस अधिकारी म्हणून औरंगाबादेत डीसीपी आणि एसपीपदी कार्यरत होते. औरंगाबाद मध्येच एटीएस डीसीपी पदी नियुक्ती झाली. त्यानंतर बॅनर्जींची ठाण्यात बदली करण्यात आली होती.
ज्या टेबलवर बसून संजय बॅनर्जी आणि त्यांचे कुटुंबीय जेवणासाठी बसले होते, त्याच ठिकाणी एटीएस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली. असं नेमकं काय घडलं की बॅनर्जी यांनी आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत आहेत.
First Published: Saturday, March 23, 2013, 20:52