Last Updated: Wednesday, March 26, 2014, 21:25
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेसनी लिऑनच्या ‘रागिनी एमएमएस टू’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला हनुमान चालीसा म्हणण्यात आली आहे. अशा अश्लील चित्रपटात हनुमान चालीसाचा उल्लेख हा हिंदू धर्मिंयाचा अपमान असल्याचं हिंदू जनजागृती समितीनं म्हटलं आहे.
यापूर्वी इंदूर येथे बजरंग दलानेही रागिनी एमएमएस २ वर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच सनी लिऑनला इंदूरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.
या चित्रपटावर बंदी आणावी म्हणून ठाणे स्टेशन परिसरात नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. या स्वाक्षऱ्यांचे कागद सेर्न्सार बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहेत. या चित्रपटावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू जनजागृतीच्या साध्वी सरस्वती यांनी दिला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 26, 2014, 21:25