नवी मुंबईतील बँक दरोडा प्रकरणी पाच अटकेत, bank robbery in navi mumbai, 5 arrested

नवी मुंबईतील बँक दरोडा प्रकरणी पाच अटकेत

नवी मुंबईतील बँक दरोडा प्रकरणी पाच अटकेत
www.24taas.com झी मीडिया, नवी मुंबई

नवी मुंबईच्या खारघर इथल्या बँक दरोडा प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आठ ऑगस्टला इथल्या कॅश मॅनेजमेंट या कंपनीच्या कार्यालयासमोर दरोड्याची ही घटना घडली होती.

बॅकांमध्ये रक्कम पोहचवण्याचे काम करणा-या कंपनीचे कर्मचा-यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १० लाखांची रोकड लुटण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ५ जणांना अटक केलीय.

यापैकी काही जण टूरिस्ट कंपन्यांमध्ये गाडी चालवण्याचं काम करतात. त्यामुळे ओळखीचा गैरफायदा घेवून ते भाड्याने गाड्या घेत आणि दरोडा टाकण्यासाठी जाताना सदर गाडीची नंबर प्लेट बदलून त्यावर बनावट नंबर प्लेट लावत असत. खारघरच्या दरोडा प्रकरणात देखील त्यांनी अशाच प्रकारे भाड्याची गाडी वापरून दरोडा टाकला होता.

या पाचही जणांनी चौकशीत इतर ४ दरोड्यांची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरलेली शस्त्रं, ३गाड्या असा मुद्देमाल जप्त केलाय.. मात्र आतापर्यंत या टोळीने लुटलेल्या ३ कोटींचा पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही.. त्यांनी हे पैसे महाराष्ट्राबाहेर आपल्या मूळगावी पाठवले का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 12:01


comments powered by Disqus